केम येथे विठ्ठल-रुक्मिणी यांचा थाटात विवाह सोहळा संपन्न
केम(संजय जाधव): वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि २ फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणी विवाह सोहळा पंरपरेनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संपन्न झाला.
या निमित्त विठ्ठल व रुक्मिणी मातेला मोत्याचे दागिणे अलंकार परिधान करण्यात आले. गावातून परणा काढण्यात आला. या निमित्त हरिदास बिचितकर दांपत्यांनी विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती हातात घेतली. टाळ मृदंगाच्या गजरात हा परणा काढण्यात आला. या वेळी हि मिरवणूक पाहण्यासाठी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.
त्यानंतर परणा मंदिरात आला. या नंतर लगीन घाई सुरू झाली. कुरवल्या नटून तुटून आल्या होत्या. देव बप्पा विजय कुलकर्णी व पराग कुलकर्णी होते. सनई चौघाडा सुरू केला संपूर्ण मंदिर वऱ्हाडी मंडळीने भरून गेले होते. अक्षदा वाटण्यात आल्या. मुलाचे मामा म्हणून हरिदास बिचितकर व मुलीचे मामा भरत बिचितकर उभा राहिले. दोघानी एकमेकाला साखर भरवली. मंगलष्टीका सुरू झाल्या एकूण सात मंगलष्टीका म्हणण्यात आल्या.
विजय कुलकर्णी,पराग कुलकर्णी, सुजाता सासवडे,अनिल तळेकर यांनी मंगलाष्टके म्हणाल्या शेवटची मंगलष्टीका झाल्यावर लग्णासाठी आलेल्या हजारो भाविकाना हरिदास बिचितकर,व भरत बिचितकर यांच्या वतीने जेवणाची सोय केली होती. याचा आस्वाद भाविकांनी घेतला तसेच विठ्ठल रुक्मिणी मातीला 56 दोघांचा नैवेद्य दाखवण्यात आला हा नैवेद्य विठ्ठल महिला भजनी मंडळ व स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या वतीने देण्यात आला.
या लग्न सोहळयासाठी मैना पळसे, सुजाता सासवडे, मनिषा गिराम सरपंच सारिका कोरे, अनिता गुरव, कौशल्या भिस्ते, आश्विणी बिचितकर यानी परिश्रम घेतले.