विठ्ठलराव रोडगे यांना मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

करमाळा (दि.७) – सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे दिला जाणारा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा चे ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव भागवत रोडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोलापूर येथे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, आणि फेटा असे असून, लवकरच हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. विठ्ठलराव रोडगे हे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक असून, त्यांनी या शाळेत ३३ वर्षे अखंड सेवा केली आहे. त्यांच्या या सन्मानाने पंचक्रोशीतील सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.




