करमाळा शहरात पथनाट्याद्वारे मतदारजागृती

0

करमाळा (प्रतिनिधी) : लोकशाही मजबूत करण्याच्या उद्देशाने करमाळा नगरपरिषदेतर्फे आज, 27 नोव्हेंबर 2025 रोजी, स्वीप उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी मतदार जागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषद व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. पथनाट्यामार्फत नागरिकांना मतदानाचे महत्व समजावण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला किंवा अमिषाला बळी न पडता मतदान करावे, लोकशाही बळकट करावी, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

या जनजागृती उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रलोभनाला बळी न पडता जबाबदारीने मतदान करू, मतदानाचा टक्का वाढवू, असा सकारात्मक अभिप्राय नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!