जोरदार पावसामुळे सिना नदीच्या संगोबा बंधाऱ्यात पाणी – शेतकऱ्यांमध्ये समाधान
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहर व तालुक्यात सर्वदूर काल (ता.४) रात्री १० वाजल्यानंतर मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागले आहे, विशेष म्हणजे हा पावसाळा सुरू झाल्यानंतर काल पहिल्यांदाच सिना नदी पावसाच्या पाण्यामुळे वाहू लागली आहे, त्यामुळे संगोबा (ता.करमाळा) येथील बंधारे भरून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
करमाळा तालुक्यात यावर्षी काही ठिकाणी समप्रमाणात तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला होता, परंतु काल रात्रीचा पाऊस तालुक्यातील बऱ्याच भागात जोरदार झालेला आहे, काही ठिकाणी या पावसामुळे नुकसान झालेले देखील पहायला मिळाले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी या पावसामुळे जमिनीतील पाणीसाठा वाढत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.