खंबीर मनगटातून आपण भविष्य उभा करू शकतो : प्रा.गणेश करे-पाटील - Saptahik Sandesh

खंबीर मनगटातून आपण भविष्य उभा करू शकतो : प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माझा जन्म कोणत्या घरात व्हावा हे माझ्या हातात नाही ,माझा रंग कोणता असेल हे माझ्या हातात नाही ,माझा जन्म कोणत्या पंथात व्हावा हे माझ्या हातात नाही,माझा जन्म कोणत्या जातीत व्हावा हे माझ्या हातात नाही ,तळ हातावरच्या रेषा दाखवून भविष्य बघण्यापेक्षा तळ हाताच्या पाठीमागे असणाऱ्या खंबीर मनगटातून आपण भविष्य उभा करू शकतो हे मात्र आपल्या हातात आहे, त्यासाठी खूप प्रयत्न करा, खूप कष्ट करा यश तुमचंच असेल असे मत यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.

मोरवड (ता.करमाळा) येथील महात्मा जोतीराव फुले विद्यालय या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व शुभचिंतनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

२६ जानेवारी २०२३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये त्यांनी केलेले आवाहन ग्रामस्थांनी पूर्ण केल्यामुळे त्यांनी विद्यालयास ५१ हजार रुपये जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर यांनी केले. यावेळी इयत्ता पाचवी ते नववी मधील अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गोड मिष्टान्न देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्गशिक्षक गणेश गायकवाड यांनी केले आभार प्रदर्शन बाळासाहेब बनकर यांनी केले, यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!