केम आरोग्य केंद्रातील १० रिक्त पदे कधी भरणार? अनेक महिन्यांपासून मागणी प्रलंबित
केम(प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. याचा फटका केम आरोग्य यंत्रणेवर होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार मागणी करूनही या आरोग्य केंद्रातील जागा भरल्या जात नाही. केम आरोग्य केंद्रातील १० रिक्त पदे कधी भरणार? असा सवाल जनतेतून केला जात असून ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.
केम गावात प्राथमिक आरोग्य केद्र असून या केंद्रांतर्गत एकूण १७ गावे आहेत. या मध्ये चार उपकेंद्र निंभोरे, पांगरे, घोटी, कंदर या गावात आहेत. केम गावची लोकसंख्या सुमारे १५ हजाराच्या आसपास आहे. या आरोग्य केंद्रांत एकूण २२ पदे आहेत. त्यापैकी १२ पदे कार्यरत असून तर एकूण १० पदे रिक्त आहेत. या मध्ये प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ आरोग्य निरीक्षक १ आरोग्य सहाय्यक १, आरोग्य सेवक ३, आरोग्य सेविका २ कनिष्ठ सहाय्यक १ परिचर १ असे मिळून १० पदे रिक्त आहेत. हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज असून येथे वीज, पाणी, स्वच्छता उत्तम प्रकारे आहे केम प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध प्रकारचे लसीकरण डिलिवरी, लहानाचे शिशुचे डोस या प्रकारचे प्रथमोपचार केले जातात.
या केंद्रात दररोज ७० ओ.पी.डी होतात या प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वानाची लस सर्पदंश लस उपलब्ध आहेत येथील कर्मचारी रात्र,दिवस काम करतात रात्री, अपरात्री रूग्ण येतात त्याना चांगली सेवा दिली जाते रूग्णांची कसली तक्रार नाही कॅम्प असल्यावर येथील कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागते. त्या वेळेस येथे कर्मचारी अपूरे पडतात. काही वेळेला गोळया औषध द्यायला कर्मचारी एकच असतो. वारंवार मागणी करूनही या आरोग्य केंद्रातील जागा भरल्या जात नाही. आता नवीन आलेल्या सी.ओ. मनिषा आव्हाळे रिक्त जागेसाठी काय निर्णय घेतात या कडे केम ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्यासाठी वारंवार मागणी करूनही देखील या आरोग्य केंद्रातील जागा भरलेल्या नाहीत. विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदचे या अगोदरचे अध्यक्ष याच केम गावातून होते ही मोठी शोकांतिका आहे.
– वर्षा चव्हाण, शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा, केम