भावकीबरोबर भांडायला का येत नाही म्हणून दगडाने मारहाण

करमाळा (दि.२१): भावकीबरोबर भांडायला का येत नाही म्हणून एकास दगडाने मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार १८ मे ला सायंकाळी सहा वाजता विहाळ येथे घडला आहे. या प्रकरणी सचिन वैजिनाथ मारकड (रा. विहाळ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की १८ मे ला सायंकाळी सहा वाजता मी माझ्या घरासमोर असताना माझा चुलता तात्या शंकर मारकड हा आला व तु आपल्या भावकीबरोबर भांडण करायला का येत नाही.. असे म्हणाला. त्यावेळी मी त्यांना भांडण करू नका असे समजावून सांगताना तु मला कोण समजावून सांगणार.. असे म्हणून त्याने पडलेला दगड हातात घेऊन माझ्या डोक्यात मारून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.





