संतोष काळे यांच्या उपचारासाठी पत्नीचे आर्थिक मदतीचे आवाहन.. - Saptahik Sandesh

संतोष काळे यांच्या उपचारासाठी पत्नीचे आर्थिक मदतीचे आवाहन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : किल्लावेस येथील रहिवाशी व रंगकाम करणारे संतोष काळे हे गेली चार वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असून, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्यामुळे काळे यांना आठवड्यातून दोन वेळा डायलेसिससाठी नगर येथे जावे लागते. काळे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. मुले शिक्षण घेत असून पत्नी साधना हिच्यावर कुटूंबाची जबाबदारी आहे. परिस्थिती नाजूक असल्यामुळे संतोष काळे यांचेवर उपचार करण्यासाठी त्यांचे पत्नी साधना यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. उपचारासाठी मोठा खर्च येत असल्याने दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन पत्नी साधना संतोष काळे यांनी केले आहे.

मदतीसाठी बँक खाते : साधना संतोष काळे, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा – करमाळा. अकौंट नं. ४७०५०२१२०००११४५ (IFSC Code-UBIN ०५४७०५१), फोन पे – ९६६५८३१८१३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!