मोबाईलच्या स्टेटसवर फोटो ठेवल्याने महिलेस दगडाने व लाकडाने मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मोबाईलच्या स्टेटसवर फोटो ठेवल्याने महिलेला चौघा जणांनी लाथाबुक्क्याने, दगडाने व लाकडाने मारहाण करून जखमी केले आहे. हा प्रकार देवळाली (ता. करमाळा) येथे १५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडला आहे. यात संजय ताया वाघमोडे (रा.देवळाली, वैदवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेआठ वाजता मी घरी असताना भारत वाघमोडे, रेखा वाघमोडे, गुलाब वाघमोडे, किरण वाघमोडे हे आले व त्यांनी तुझी बहिण काजल हिने माझ्या बहिणीचा फोटो तिच्या मोबाईलच्या स्टेटस्ला का ठेवला असे म्हणून तिला लाथबुक्क्यांनी, काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे.

