युवा एकलव्य प्रतिष्ठानच्या गरबा महोत्सवात महिलांनी लुटला दांडियाचा आनंद
करमाळा (दि.१०) : करमाळा येथील युवा एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहरात गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या गरबा उत्सवात शहरातील हजारो महिलांनी दांडियाची फेरी धरत आनंद लुटला.
युवा एकलव्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संग्राम माने यांच्या नेतृत्वाखाली या गरबा महोत्सवाचे आयोजन केले गेले. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात केवळ मुली, महिलांचा सहभाग असल्यामुळे सहभागी महिलांनी मुक्त वातावरणात गरबा खेळण्याचा आनंद लुटला.
युवा एकलव्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी कृष्णा भागवत, सुयश खडके, आकाश घाडगे, बंटी आरेकर, अथर्व घाडगे, अभिषेक शिंदे, प्रफुल्ल जाधव, अनुप शिंदे, संकेत हांडे, धीरज शिंदे, कविराज माने व सुयश शिंदे यांनी अतिशय नेटकेपणाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तसेच माही डेकोरेशनचे मंगेश गोडसे, नृत्यदिग्दर्शक निलेश भुसारे सर, अडसूळ लाईट्सचे अनिकेत अडसूळ, रायबा साऊंड्स व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.
आगामी काळातही सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतील. असे युवा एकलव्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऍड. संग्राम माने यांनी सांगितले.