नंदन प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा : गणेशोत्सवानिमित्त करमाळा येथील नंदन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणी या कार्यक्रमाला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्या महिलांना शेगडी, मिक्सर, पैठणी, साड्या यांसह विविध गृहपयोगी वस्तू व रोख बक्षिसे देण्यात आली.

नंदन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जितेश कटारिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाली.

या कार्यक्रमासाठी ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजक संदीप पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाटील यांनी आपल्या सहकलाकारांबरोबर विविध सुरेल गीत सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महिलांनी या सुरेल कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक करत असे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून महिलांसाठी रोजच्या जीवन
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांच्या दैनंदिन व्यस्त जीवनातून एक दिवस वेगळा आणि मनोरंजक पद्धतीने साजरा करण्याची संधी प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना गृहपयोगी साहित्य व रोख रक्कम अशी बक्षिसे देण्यात आली. सहभागी महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया यांचे आभार मानले आणि त्यांच्या भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



