कुस्तीपटू आश्लेषा बागडेची भारतीय संघात निवड

करमाळा (दि. २१) : दिल्ली येथे १८ जून २०२५ रोजी भारतीय कुस्ती महासंघातर्फे आयोजित निवड चाचणीत ५९ किलो वजनगटात करमाळा (जि. सोलापूर ) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची कुस्तीपटू कु. आश्लेषा बागडे हिने अंतिम फेरीत विजय मिळवत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. ५ ते १३ जुलै २०२५ दरम्यान कझाकिस्तान येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेत ती भारताचे नेतृत्व करणार आहे.

या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, संभाजी किर्दाक तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. रामकुमार काळे यांनी आश्लेषाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.







