करमाळ्यात 1 मार्चला ‘कुस्ती’चा रणसंग्राम – कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा : पै.सुनीलबापू सावंत

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारत विरुद्ध इराण भव्य कुस्तीचा आखाडा करमाळा येथील जीन मैदान येथे शुक्रवार 1 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता भरवण्यात आला असून, या कुस्त्यांचा कुस्तीप्रेमींनी लाभ घ्यावा असे आव्हान करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने पै.सुनीलबापू सावंत यांनी आवाहन केले आहे.
यावेळी सावंत म्हणाले की, ‘हनुमान जयंती’चे निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये भारत देशातील तसेच इराणमधील नामवंत पैलवानांना आमंत्रित करण्यात आले आहे, यामध्ये नंबर १ ची कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफीक विरुद्ध पैलवान हादी इराणी नंबर २ ची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.प्रकाश बनकर तसेच उपमहाराष्ट्र केसरी पै गणेश जगताप पै माहदी इराणी, तसेच नेपाळ चा कुस्तीतील जादुगीर पै देवा थापा , महाराष्ट्र चॅम्पियन पै अनिल जाधव पै हितेश पाटील, पै अमित लखा हरिद्वार तसेच अनेक नामवंत पैलवानाचे कुस्त्यां होणार असून 51 रुपये पासुन ते 5001 रुपये पर्यंत च्या कुस्ती सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत सावंत गल्ली येथील सावंत तालीम येथे नेमल्या जातील. यावेळी मैदानावर प्रेक्षणीय व चित्रथरार कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पैलवान दादासाहेब इंदलकर सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, मनसेचे शहर प्रमुख नानासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर, पै नागेश सूर्यवंशी (कसाब), पै गणेश सावंत, पै तुकाराम इंदलकर, पै, गणेश आडसुळ परिश्रम घेत आहेत.

