अजित कणसे यांना यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार प्रदान
करमाळा (दि.११) – करमाळा येथील यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वसंत महोत्सवाच्या निमित्ताने ‘शालेय परिपाठ’ या पुस्तकाचे लेखक अजित कणसे यांना ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व शालेय परिपाठ पुस्तक हे पुरस्काराचे स्वरूप होते.
अजित कणसे हे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालसे येथे प्राथमिक शिक्षक, करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत सर्वोदय प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतले आहेत. तसेच त्यांनी लिहिलेले शालेय परिपाठ हे महाराष्ट्रातील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक, सहकार, संघटनात्मक व साहित्यिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
यावेळी यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, डॉ. सुनीता जोशी, डॉ. प्रचिती पुंडे, डॉ. रोहन पाटील, बाळकृष्ण लावंड, दयानंद चौधरी, कल्याणराव साळुंखे, विष्णु शिंदे, संतोष शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.