‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये यशपाल कांबळे यांचा जाहीर प्रवेश..

वंचित बहुजन आघाडी मध्ये करमाळा येथील यशपाल कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला आहे, यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, वंचित बहुजन आघाडी मध्ये यशपाल कांबळे यांचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण व जिल्हा महासचिव विशाल नवगिरे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश घेण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथून आरक्षण बचाव यात्रा सुरू होणार आहे, यासंदर्भात टेंभुर्णी येथे बैठक घेण्यात आलेली होती, या बैठकीत श्री.कांबळे यांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



