संविधान दिन व जागतिक एड्स दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व विधी सेवा समितीमार्फत भव्य रॅलीचे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, विधी सेवा समिती व वकील संघ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सप्ताह व एड्स दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ करमाळा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सौ.मिना एखे, सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संस्थेचे सचिव विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, ॲड.महादेव कांबळे, ॲड.योगेश शिंपी तसेच वकील संघाचे पदाधिकारी , राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तरचे जिल्हा समन्वयक प्रा.एल.टी.राख , कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक तसेच NCCचे CT0 निलेश भुसारे तसेच सर्व न्यायालयीन स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.
संविधान सप्ताह व एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घोषणा देवून करमाळा शहरात आवाज उठविला होता. याप्रसंगी रॅली दरम्यान शहरातील थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
तसेच एड्स दिनाचे औचित्य साधन राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती केली सदर रॅलीचे सांगता समारंभ महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. सांगता समारोप प्रसंगी करमाळा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सौ.मिना एखे, सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. स्वयंसेवकांचे पथनाट्य पाहून कौतुक केले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ॲड.महादेव कांबळे यांनी संविधान दिनाची माहिती सांगितली तसेच या रॅलीमध्ये 9 MAH बटालियनचे कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.