यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा (दि.४) : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न झाली.
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. विलासरावजी घुमरे, तालुक्याचे युवानेते मा.दिग्वीजय बागल, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, प्रमुख व्याख्याते प्रा.नितिन तळपाडे,।भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री.किरण बोकन, जिल्हा उपाध्यक्ष श्याम सिंधी, तालुका अध्यक्ष सचिन पिसाळ हे मान्यवर उपस्थित होते.
व्याख्याते प्रा.नितीन तळपाडे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करून सावित्रीबाई फुले यांच्या या क्रांतीमुळे आज सर्व महिलांना शिक्षण खुलं झाले आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे करमाळा तालुक्याचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईच्या कार्याचा उल्लेख करून माझी सावित्री ही माझी आई आहे असे सांगून महिलांच्या कार्याचा गौरव केला. तसेच 12 वी कॉमर्स या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी खोमणे हिने, ‘मी सावित्री बोलते’ या मनोगतातून सावित्रीबाईंच्या वेशभूषेतून कार्याचा जीवनपट थोडक्यात मांडला तर अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक सावित्री उभे असते असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सौ.अनिता देशमुख-साठे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा.एम.डी.जाधव यांनी मानले.




