जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे खेळाडू चमकले

करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा खेळाडू अजिंक्य लक्ष्मण दळवी याने तलवारबाजीच्या सेबर प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर शुभम कांतीलाल वलटे याने याच प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, जिल्हा क्रीडा परिषद तसेच सोलापूर जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या यशस्वी खेळाडूंना शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच करमाळा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. रामकुमार काळे आणि नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




 
                       
                      