तू यश हो, यशवंत हो!

यशाला सर्व सोबत असतील,
पण अपयश मात्र एकटचं असतं.
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
तुझ्या संघर्षात तू एकटाच असशील,
पण तुझं यश धिंगाणा घालणारय.
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
तुझ्या प्रयत्नाना टाईमपास नाही
तर संघर्षाचं नाव मिळावं.
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
आई-वडीलाच्या कष्टाचं
चीज करायचंय
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
स्वप्नन तुझं, स्वप्ननच न राहता,
वास्तवात आणायचय
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
तुझे प्रयत्न कधीच कुणाला दिसणार नाही
दिसेल ते फक्त तुझं यश.
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
अपयशाला यशानेचं
जिंकता येत.
म्हणून तू यश हो, यशवंत हो….
✍️ यशवंत प्रदिप चौकटे, रा. करमाळा, जि. सोलापूर मो. ८६०००६१६७५


