मोटारसायकल व टमटमच्या अपघातात तरूणाचे निधन…

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मोटारसायकल व टमटमची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३२ वर्षाच्या युवकाचे निधन झाले आहे. हा प्रकार ११ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता कंदर शिवारात घडला आहे. या प्रकरणी अमोल जयसिंग गुटाळ (रा. केम) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ११ ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास माझा भाऊ सागर जयसिंग गुटाळ (वय – ३२) हा टेंभूर्णीहून केमकडे येत असताना कंदर शिवारात टेंभूर्णी येथील दिपक कसबे याने त्याच्या मालकीचा टमटम हा वेगात आणून त्याने माझ्या भावाच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. त्यात माझा भाऊ गंभीर जखमी झाला व त्याचे निधन झाले. या प्रकरणी पोलीसांनी टमटम चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.



