करमाळा येथील मॅरेथॉन स्पर्धेत युवक-युवतींचा उत्स्फूर्तपणे सहभाग

करमाळा(दि.१५): सुमंतनगर येथील पंचशील स्पोर्ट्स अँड सोशल प्रतिष्ठान यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करमाळा येथे काल दि.१७ फेब्रुवारीला तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ५ किमी अंतर असलेली ही मॅरेथॉन स्पर्धा नागनाथ मंदिरजवळ कर्जत रोड येथे सकाळी आठ वाजता घेण्यात आली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेला सुमारे २२१ युवक युवतींनी भाग घेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. ५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेची विजेती नंबर तीन प्रियंका कैलास काळे, देलवडी (ता.करमाळा) हिचा सत्कार करून स्पर्धेचे पारितोषिक देण्यात आले. उर्वरित बक्षिसे १९ तारखेला देण्यात येणार आहेत.

याचबरोबर या प्रतिष्ठानने १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते मंगळवार पेठ येथील नगरपालिका शाळा नंबर ४ व रंभापुरा येथील नगरपालिका शाळा नंबर ३ येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, भव्य मिरवणूक व मॅरेथॉन स्पर्धेतील इतर विजेत्यांना बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास भाजप जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे बहुजन पार्टीचे देवा लोंढे जिल्हा उपाध्यक्ष अपसर जाधव पंचशील स्पोर्ट चे नामा लोंढे पैलवान ग्रुपचे सनी जाधव युवा सेना शहर उपाध्यक्ष विशाल गायकवाड, शिवसेना युवा सेना शहर उपप्रमुख आदित्य जाधव बबलू पठाण प्रतिष्ठानचे सचिव विश्वनाथ लोंढे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हुमरान मुलाणी गणेश ढाकणे कार्याध्यक्ष सोनू घोडके अनिकेत जाधव अमोल आवड रवी ओहोळ ऋषिकेश सूर्यवंशी राजरत्न कांबळे अतुल साने सुमित जाधव सौदागर बनसोडे रितेश लोंढे आदित्य घोडके अजय जाधव मुन्ना साळवे गणेश कांबळे बाळू आवड अफजल मुलाणी अरुण लोंढे नागेश ओहोळ जहांगीर मुलानी आकाश दामोदर आकाश धनवे, अजर मुलाणी अमन मुलाणी सार्थक लोंढे तुषार साखरे ऋषिकेश धनवे रोहन ओहोळ वरील सर्व उपस्थित होते.





