किरकोळ कारणावरून तिघांकडून तरुणास बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : किरकोळ कारणावरून तिघांकडून एका तरूणास ५ मार्च २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार तरटगाव, ता.करमाळा येथे घडला आहे. या प्रकरणी भारत जयद्रथ नलवडे (रा. तरटगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की तरटगाव येथील माझ्या शेतीत समाईकातील विहिरीवरून ५ मार्च २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता ऊसाच्या शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू केली होती. त्यावेळी संतोष अंकुश नलवडे (रा.तरटगाव) हा शेताजवळून जात होता. त्यावेळी त्याने तुझी व गोकुळची कशावरून शिवीगाळ झाली असे विचारले. त्यावेळी मी आपण बसून चर्चा करून हा विषय मिटवू असे म्हणत असतानाच शरद अंकुश नलवडे, गोकुळ अंकुश नलवडे हे आले व त्यांनी लाकडी काठीने, लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.





