करमाळ्याची विधानसभा शिवसेना धनुष्यबाणावरच लढवणार – युवासेना सचिव किरण साळी
करमाळा (दि.८) – करमाळा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असून करमाळा विधानसभा शिवसेना धनुष्यबाणावरच लढवणार हा मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी थांब भूमिका युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी मांडली. करमाळा येथे लाडकी बहीण स्नेह मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील पाच जागा धनुष्यबाणावर लढवणार अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे महायुतीत अजून नवीनच वाद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे डॉक्टर श्रद्धा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते
या मेळाव्याला जवळपास 2000 महिलांनी उपस्थिती लावली होती. यातील बांधकाम नोंदणीकृत 567 महिलांना प्रत्येकी दहा हजार आठशे रुपयांचे 65 लाख रुपयांची भांडी वितरण करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना किरण साळी म्हणाले की, 1995 पासून शिवसेना ही जागा धनुष्यबाणावर लढवत आहे अनेक जण आले आणि गेले पण पक्ष जागेवर आहे शिवसेनेला मानणारा मोठा मतदार या ठिकाणी असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली सक्षम पक्ष बांधणी झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिला मतदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करणार आहेत त्यामुळे करमाळा मतदार संघातील शिवसेनेचा विजय निश्चित आहे.
सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी सात जागा शिवसेना लढवत होती व चार ते पाच आमदार शिवसेनेची निवडून यायचे हे पुनर्वैभवप्राप्त करून देण्यासाठी शिवसेना शहर मध्य माढा करमाळा सांगोला मोहोळ या पाच जागेवर कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असून शिवसेना बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी कामाला लागले असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख राहुल कानगुडे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत युवा सेना तालुकाप्रमुखनवनाथ गुंड ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख सुरेश करचे शहर प्रमुख माधव सूर्यवंशी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे या शेकडो पदाधिकारी उपस्थित होते
करमाळा तालुक्यातील जनावरांचे प्रसिद्ध डॉक्टर व दुग्ध व्यवसायिक डॉक्टर गौतम रोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना किरण साळी यांच्या हस्ते उपतालुकाप्रमुख नियुक्तीचे पत्र देण्यात आले.