करमाळा येथे शिवआरोग्य सेनेच्या नेत्रशिबीरात ६०० रूग्णांची करण्यात आली मोफत तपासणी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या वतीने करमाळा येथील सुतार गल्लीत असलेल्या रेवती हाॅस्पिटल मध्ये रविवारी (१६ एप्रिल) नेत्ररुग्ण तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ६०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या मध्ये १९१ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार असून या पैकी ४१ रुग्णांना ऑपरेशन करता पाठवण्यात आले.

शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डाॅ किशोर ठाणेकर, राज्य सचिव डाॅ अजित पाटील, जिल्हा समन्वयक दिपक सुर्वे, जिल्हाअध्यक्ष डाॅ रामलिंग शेठे ,डाॅ आडकर यांच्या माध्यमातून हे शिबीर पार पडले. यामध्ये मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,डोळ्याच्या तिरळेपणावर उपचार, डोळ्यात वाढलेले मांस काढणे इत्यादी तपासणी करण्यात आली. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित केले होते.

शिबिराला उपस्थित रुग्ण व नातेवाईक

या कार्यक्रमास जेष्ठ नेते शाहुदादा फरतडे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, विधानसभा संघटक संजय शिंदे (नेते) शहरप्रमुख प्रवीण कटारिया, उप शहरप्रमुख संतोष गानबोटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, उप तालुकाप्रमुख तथा बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड विकास जरांडे,बंडू शिंदे पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे,युवासेना, जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर उपजिल्हायुवा अधिकारी मयुर यादव, तालुका समन्वयक कुमार माने, शहर युवा अधिकारी समीर परदेशी,तालुका चिटणीस पांडुरंग ढाणे , उपतालुकाप्रमुख समाधान यादव, अभिषेक मोरे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, सोशल मिडीया समन्वयक अजयराजे साखरे उपशहर युवा अधिकारी, कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, काॅलेज कक्ष प्रमुख दर्शन कुस्कर , सोगाव शाखा प्रमुख ओकांर कोठारे, उप शाखा प्रमुख मयुर तावरे विनोद पाटील बोरगावचे विष्णू शिंदे आदी उपस्थित होते.

या वेळेस बोलताना शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डाॅ किशोर ठाणेकर म्हणाले कि शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार शिव आरोग्य सेना संपूर्ण राज्यात सर्व सामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी तळगाळात जावुन आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक दिपक सुर्वे, जिल्हा अध्यक्ष डाॅ आडकर, डाॅ रामलिंग शेठे शिवसेना शहरप्रमुख प्रवीण कटारीया, माढा तालुका समन्वयक धन्यकुमार चोपडे ,वर्षाताई चव्हाण यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

रेवती हाॅस्पिटल चे डाॅ ऊमेशकुमार जाधव यांनी मोफत हाॅस्पिटल उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डाॅ किशोर ठाणेकर यांच्या हस्ते दोंघांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तावीक शंभूराजे फरतडे यांनी केले तर आभार संतोष गानबोटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!