सावंत गटाच्यावतीने करमाळा शहरात स्वखर्चाने मोफत टॅंकरने पाणीपुरवठा.. -

सावंत गटाच्यावतीने करमाळा शहरात स्वखर्चाने मोफत टॅंकरने पाणीपुरवठा..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्याने शहरवासियांचे पाण्यापासून हाल होत आहेत, त्यामुळे सावंत गटाचे नेते माजी नगरसेवक संजय सावंत तसेच पै.सुनीलबापू सावंत यांनी स्वखर्चाने पाण्याचा टॅंकर सुरू केला आहे, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

करमाळा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे पाणी टंचाई जाणवत आहे. सध्या उजनीचे पाणी पंढरपूर यात्रेसाठी सोडल्याने उजनी धरणाची पाणीपातळी खाली गेली आहे, करमाळा शहराला ज्या दहिगाव येथील पंप स्टेशनवरून पाणी येते त्या ठिकाणी पाणी नसल्याने स्टेशनपर्यंत पाणी आणण्यासाठी चारी खोदण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा पुरेसा होत नाही, त्यामुळे सध्या करमाळा शहरात पाणीटंचाई जाणवत आहे. करमाळा नगरपरिषदेने या अगोदरच चारी खोदण्याचे काम केले असते तर पाणी पाणीटंचाई जाणवली नसती.

करमाळा शहराला सलग ४ ते ५ दिवस पाणी सोडले नाही असे बऱ्याच वर्षांतून घडले आहे. शहरात गेल्या ४ ते ५ दिवसापासून पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत होते, हि उणीव भरून काढण्यासाठी नगरसेवक संजय सावंत तसेच सावंत गटाचे नेते सुनीलबापू सावंत यांनी स्वखर्चाने  मोफत टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. यामुळे करमाळा शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी सावंत गटाचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!