करमाळ्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी – 56 रक्तदात्यांनी केले रक्तदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली, या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक विद्युत रोषणाईने बहरले होते, तसेच फुलांनी स्मारकाची सजावट देखणी केली होती.
याप्रसंगी करमाळा शहरातील अनेक मान्यवरांनी स्मारकास पुष्पहार अर्पण केले. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याचे उद्घाटन प्रा.गणेश भाऊ करे-पाटील व विलासराव घुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा सन्मान क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने घेण्यात आला. तसेच ज्यांनी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र व माता सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. वर्षभरात कोणालाही रक्त हवे असेल तर ते मोफत दिले जाईल असे आवाहन क्रांतीसुर्य प्रतिष्ठान करमाळा यांच्यावतीने करण्यात आले.
यश कल्याणी सेवाभावनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते खंडू डोईफोडे यांचे व्याख्यान महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा जागर व्हावा म्हणून ठेवले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश भाऊ करे-पाटील होते. करमाळा शहरातील अनेक मान्यवर पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. अमोल नाळे, नवनाथ मोहोळकर, विक्रम राऊत, अंकुश जाधव, हनुमंत भोंग, मयूर यादव, विशाल बनकर, प्रशांत शिंदे व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच याप्रसंगी भाजपचे गणेश चिवटे, मनसे चे तालुका अध्यक्ष संजय घोलप, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, सुहास ओहोळ,भारिप नेते शहाजी ठोसर, भिमदल चे जिल्हा अध्यक्ष सुनील भोसले, भाजप तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिह ठाकुर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन होगले,तालुका उपाध्यक्ष राजू ठोंबरे, विकास मेरगळ, संजय घोरपडे, संतोष कांबळे, मनोज कुलकर्णी, रघूवीर खटके,आण्णा सुपनवर, क्रांतीसुर्य प्रतिष्ठिन जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.