धायखिंडी ते करंजे या रस्त्याचे गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन - ७३.७५ लाख रु.चा निधी मंजूर - Saptahik Sandesh

धायखिंडी ते करंजे या रस्त्याचे गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन – ७३.७५ लाख रु.चा निधी मंजूर


करमाळा (दि.११) – सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या निधीतून  धायखिंडी ते करंजे या रस्त्यासाठी 73.75 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गणेश चिवटे म्हणाले की पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून आपण धायखिंडी ते करंजे हा रस्त्याच्या कामासाठी  73.75 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे.

करंजे गावचे मा. सरपंच काकासाहेब सरडे यांनी हा रस्ता खूप खराब असून या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी येत असून हा रस्ता मंजूर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला असल्याचे गणेश चिवटे यांनी  सांगितले.

या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, वंजारवाडी चे सरपंच प्रवीण बिनवडे, झरे गावचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, धायखिंडी चे हर्षल शिंगाडे,  माजी सरपंच महादेव वायकुळे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे, आत्माराम वायकुळे, वैजिनाथ महानवर, मनसुर मुलाणी, यांच्यासह करंजे येथील आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पोपटबापू सरडे , सरपंच सुभाष सरडे,  विकास सोसायटीचे चेअरमन यशवंत पवार, माजी सरपंच राजेंद्र जाधव

विजयकुमार बाबर गुरजी ,ग्रामपंचायत सदस्य गणेश सरडे, तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र सरडे, रावसाहेब सरडे ,बाबासाहेब निकम ,हर्षल शिंगाडे , रणजीत पवार,  नितीन पवळ ,  संजय सरडे, जनार्दन पवळ, प्रदीप साबळे, नितीन सरडे, आण्णासाहेब गोडगे, उद्य सरडे,  रवी शिंदे,  पप्पू शिंगाडे,  बापू महानोर,  सौदागर शिंदे,  प्रशांत जाधव,  अभिजीत दळवी, ऋतुराज पालखे , गुरलिंग गोडगे ,चंद्रकांत सरडे,  विकी सरडे ,किरण बागल, भैय्या कुंभार, किरण शिंदे, वसीम सय्यद, मंगेश मुरूमकर, गणेश गोसावी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!