कंदर–केम–रोपळे रस्ता दुरुस्तीबाबतचे पालकमंत्र्यांना निवेदन

केम(संजय जाधव): या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कंदर–केम–रोपळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने प्रवास करतात. हा रस्ता तातडीने दुरुस्त होण्याची गरज आहे. याबाबत केमचे ग्रामस्थ मकाईचे संचालक महेश तळेकर, बाजार समितीचे माजी संचालक महावीर तळेकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ आदींनी महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे रस्ता दुरुस्तीबाबतचे निवेदन दिले आहे.

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गोरे हे करमाळा येथे आले होते. यावेळी बागल गटाच्या कार्यालयात भाजपाची मीटिंग पार पडली यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.



