फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील विकासाला दिशा मिळणार - गणेश चिवटे - Saptahik Sandesh

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील विकासाला दिशा मिळणार – गणेश चिवटे


करमाळा (दि.४) – देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विकासाला दिशा मिळणार असल्याचे मत गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.  भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड होताच करमाळ्यात भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून करमाळा भाजपा संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाला मत दिले आहे , आज भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम होईल असा आत्मविश्वास भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे, येणाऱ्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आपणही करमाळा तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गेली अनेक दिवस प्रलंबित असलेली भाजपा विधिमंडळ पक्षनेता पदाची निवड आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांच्या बैठकीत झाली. यावेळी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपा गटनेते पदी निवड झाली असून आता त्यांचे मुख्यमंत्री पद निश्चित झाले असुन उद्या ते शपथ घेतली.

यावेळी अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे , जगदीश अग्रवाल, भगवानगिरी गोसावी,  काकासाहेब सरडे ,अमोल पवार, नितीन झिंजाडे, प्रवीण बिनवडे, गणेश महाडिक,  जयंत काळे पाटील,सोमनाथ घाडगे,  भैयाराज गोसावी,  किरण शिंदे,  नितीन निकम,  नानासाहेब अनारसे, दिनेश काळे,  बापू तांबे , सचिन गायकवाड, दत्तात्रय वाळुंजकर, संगीता नष्टे , पूजा माने, राजश्री खाडे, चंपावती कांबळे, कमलेश दळवी, नागनाथ घाडगे, सयाजी जाधव, कपिल मंडलिक, राजेश पाटील, प्रकाश ननवरे, सुभाष शिंदे, गणेश झाकणे, प्रसाद गेंड , वसीम सय्यद, किरण बागल,  गणेश माने,  भैय्या कुंभार, संजय किरवे, शंभू किरवे, संजय जमदाडे, दादा गाडे, अतुल इंदुरे, दिपक शेळके, भरत चोपडे, विवेक अवसरे, गणेश गोसावी, विनोद इंदलकर, महादेव गोसावी, भरत गुंड, संतोष जवकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!