भाजप शहराध्यक्षपदी अगरवाल, तर सरचिटणीसपदी झिंजाडे आणि सुरवसे यांची निवड

करमाळा(दि.५) – भारतीय जनता पक्षाच्या करमाळा शहर करमाळा शहराध्यक्षपदी जगदीश अगरवाल, तर नितीन झिंजाडे आणि आजिनाथ सुरवसे यांची मंडळ सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. ही निवड शुक्रवार, ४ जुलै रोजी करमाळा येथील भाजपा कार्यालयात आयोजित बैठकीतकरण्यात आली.

या बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना श्री. गणेश चिवटे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह गोरे यांच्या नेतृत्वात आपण कार्य करत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी थेट संपर्क ठेवत काम करावे.”

शहराध्यक्ष जगदीश अगरवाल यांनी सांगितले की, “हे पद माझ्यासाठी केवळ जबाबदारी नाही तर जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. माझे कार्य पारदर्शक व जनहिताची दिशा ठेवणारे असेल”

या वेळी आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरचिटणीस नितीन झिंजाडे म्हणाले, “पक्ष विचारसरणीप्रती निष्ठा ठेवत, संघटन मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार आहे.”

या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे, बंडू शिंदे, अमोल पवार, सोमनाथ घाडगे, दिनेश मडके, संतोष कुलकर्णी, हर्षल शिंगाडे, संजय जमदाडे, किरण बागल, प्रवीण बिनवडे, संदीप काळे, भैयाराज गोसावी, प्रकाश ननवरे, कपिल मंडलिक, राजू सय्यद, गणेश माने, नानासाहेब अनारसे, कमलेश दळवी, शैलेश राजमाने, सचिन कानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.



