जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याने सरकारने आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा – प्रा.रामदास झोळ
केम (संजय जाधव) – मराठा समाजासाठी लढणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटिल यांची उपोषणाने प्रकृत्ती अत्यंत खालावली आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवाच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तत्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा व मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अशी भावना दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी व्यक्त केली.
मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा योध्दा मनोज पाटिल यांचे उपोषण सुरू असून आज (दि.२२) उपोषणाचा ६ वा दिवस आहे. शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी प्रा. रामदास झोळ यांनी अंतरवाली सरटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
पुढे बोलताना या वेळी त्यांना बोलताना त्रास होत होता. त्यांची प्रकृत्ती अंत्यत खलावली आहे मराठा समाजाच्या लेकराच भल व्हाव म्हणून जीवाची पर्वा न करता उपोषणास बसले आहेत याची सरकारणे दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या असी विनंती रामदास झोळ यानी केली या वेळी स्वाभिमानी शेतकरी सौघटनेचे यूवा नेते गणेश मंगवडे प्रशांत नाईक नवरे प्रा संजय जगताप सागर सरडे नागेश चव्हाण उपस्थित होते.