घारगावच्या सरपंच लक्ष्मी सरवदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – स्वराज्य सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार यंदा करमाळा तालुक्यातील घारगावच्या सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांना देण्यात आला. याचबरोबर त्यांची या संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे.
३० जुलै रोजी अहमदनगर येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील आणि हवामान अभ्यासक मा.पंजाबराव डख यांच्या हस्ते सौ. सरवदे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.लक्ष्मी सरवदे यांचे सामाजिक कार्य व निस्वार्थ भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत गावाचा केलेला विकास तसेच अवैध्य दारू गुटखा जुगार बंदीसाठी ठराव,शेतकऱ्यांना मार्गदर्शन, वृक्ष लागवडी सह विविध योजना राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेले कार्य पाहून त्यांना हा पुरस्कार जाहीर केला
याचबरोबर त्यांची सरपंच सेवा संघाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही निवड ही दोन वर्षासाठी करण्यात आलेली आहे. ही निवड संस्थापक सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावशे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार ,राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे ,संघटक रवींद्र पवार ,विश्वस्त सुजाता कासार संपर्कप्रमुख अमोल शेवाळे आदींनी निवड केली आहे.