देवळाली ग्रामपंचायत सदस्या सविता चौधरी यांचा पाटील गटातून शिंदे गटात प्रवेश
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – देवळाली (ता.करमाळा) येथील माजी आमदार नारायण पाटील गटाच्या ग्रामपंचायत सदस्या सविता संजय चौधरी यांनी आज (दि.१४) आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करत पाटील गटाला धक्का दिला आहे. या प्रवेशा नंतर ग्रामपंचायत सदस्या सविता चौधरी व पती संजय चौधरी यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्यां समवेत देवळाली येथे करण्यात आला.
गेले अनेक वर्षांपासून देवळाली मध्ये जगताप, बागल व पाटील गट या तिन्ही गटाकडे गावातील राजकीय मंडळी विखुरलेली होती. संजयमामा शिंदे यांचा तालुक्यात प्रवेश झाल्यानंतर तालुक्यात एक नवा गट निर्माण झाला. तसेच संजयमामा शिंदे आमदार झाल्यानंतर या गटाला अधिकच बळ मिळाले. गेल्या दोन अडीच वर्षापासून देवळाली गावांमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात अनेकांनी प्रवेश करत इतर गटाला धक्के दिले. काही महिन्यांपूर्वी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी बागल गटाला सोडचिट्टी देऊन त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला होता. आता ग्रामपंचायत सदस्या सविता संजय चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश करून धक्का दिला आहे.
या कार्यक्रमाला देवळाली गावचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर, माजी सरपंच आशिष (अण्णा )गायकवाड, उपसरपंच धनंजय शिंदे, ग्रा.प.सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे,अण्णासाहेब कानगुडे ,संजय चौधरी चेअरमन रामभाऊ रायकर, संजय कानगुडे, बाळासाहेब गोरे गुरुजी, सुजित तात्या बागल, बंडू काका शेळके, बारीक गोसावी,दत्तू कानगुडे,ज्योतीराम गुंड,बापू गुंड,परमिल गुंड, बाळासाहेब गायकवाड ,संदीप गायकवाड, महेश झोळे, अमोल गोसावी, देविदास चौधरी ,चांगदेव झोळे, रोहिदास शेळके ,मधुकर शेळके, राजेंद्र सरडे ,इंद्रजीत शिंदे उमेश निमगिरे, रेवनाथ शेळके, राज अवताडे ,साहेबराव चौधरी ,आजिनाथ शेळके ,दगडू चौधरी उपस्थित होते.