करमाळ्यातील डायलिसिस सेंटर रुग्णांना आधार देणारा उपक्रम – उद्योग मंत्री सामंत
करमाळा (दि.१३) – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मार्फत करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या मोफत डायलिसिस सेंटर मुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी करमाळा येथे केले. सोमवारी (दि.११) महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ सभेला उद्योग मंत्री सामंत करमाळ्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांनी डायलिसिस सेंटरला भेट दिली.
करमाळा तालुक्यात व परिसरात सुमारे 940 रुग्णांना डायलिसिसची गरज आहे. करमाळा व आजूबाजूला 50 60 किलोमीटर परिसरात रुग्णांना नगर पुणे सोलापूर उपचारासाठी जावे लागत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून दहा डायलिसिस मशीन बसवण्यात आले असून मोफत डायलेसिस करून दिले जात आहे.
पुढे बोलताना सामंत म्हणाले की, शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण 20% राजकारण ही भूमिका घेऊन जिल्हाप्रमुख महेश चिवटे व मुख्यमंत्र्यांची विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांचे करमाळ्यातील सामाजिक योगदान अभिमानास्पद आहे असे उदय सावंत म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे आदीजण उपस्थित होते.
लवकरच कॅशलेस हॉस्पिटल उभा करणार -मंगेश चिवटे
करमाळा तालुका व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे सुरू केलेल्या मोफत दवाखाना या धर्तीवर करमाळ्यात कॅशलेस दवाखाना सुरू करणार आहे असे मंगेश चिवटे यांनी यावेळी आश्वासन दिले.
.