तालुक्यात शिवसेनेच्या नवीन पाच शाखांचे दिग्विजय बागल यांच्या हस्ते झाले उद्घाटन -

तालुक्यात शिवसेनेच्या नवीन पाच शाखांचे दिग्विजय बागल यांच्या हस्ते झाले उद्घाटन

0

करमाळा(संदेश प्रतिनिधी):शिवसेना (शिंदे गट) नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील चिखलठाण परिसरात शिवसेनेच्या  चार नवीन शाखांचे व आळसुंदे येथे एक अशा ५ नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रत्येक गावात “गाव तिथे शाखा” या संकल्पनेची अंमलबजावणी होत असून, नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन बागल यांनी चिखलठाण येथील मुख्य कार्यक्रमात केले.

चिखलठाण 1 येथे शाखेच्या डिजिटल बोर्डचे उदघाटन करताना

चिखलठाण येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे होते. यावेळी बोलताना बागल म्हणाले की, “आम्ही केवळ निवडणुकांपुरते नाही, तर नेहमीच लोकांच्या सुखदुःखात सहभागी राहतो. करमाळा तालुक्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आहे.”

या कार्यक्रमात केडगाव, कुगाव, चिखलठाण क्रमांक १ आणि क्रमांक २ येथील शाखांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम चिखलठाण येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र सरडे यांनी केले.

या प्रसंगी मकाई साखर कारखान्याचे संचालक दिनकर सरडे, केरू गव्हाणे यांनीही आपले विचार मांडले. मान्यवरांचे स्वागत उपसरपंच अक्षय सरडे, राहुल गोळे, समाधान गव्हाणे, शशिकांत गव्हाणे, स्वस्तिक नलावडे, ॲड. दिगंबर साळुंखे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाल गव्हाणे यांनी केले. या वेळी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, संचालक सतीश निळ, राजेंद्र मोहोळकर, युवराज रोकडे, गणेश तळेकर, सरडे भाऊसाहेब, विष्णू चव्हाण, दत्तात्रय सरडे, माजी सरपंच मुरलीधर पोळ (शेटफळ), केशव बोराडे, प्रकाश डोंगरे, महेश पोळ, दत्तात्रय सरडे, अनिकेत वीर, रणजीत गव्हाणे, स्वप्निल गोळे, धीरज सरडे, सत्यम रोकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आळसुंदेत शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन

चिखलठाण, कुगाव, केडगाव येथील शाखांनंतर आळसुंदे (ता. करमाळा) येथे शिवसेनेच्या शाखेचे शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले.

या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिग्विजय बागल यांनी तालुक्यात शिवसेनेच्या विचारांची पेरणी करून संघटन बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.

आळसुंदे येथे युवक व ज्येष्ठांचा समन्वय साधत नवीन शाखेची बांधणी करण्यात आली असून, पदाधिकारी निवडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.

या कार्यक्रमास सरपंच संजय धारक, गोविंद पाटील, किसन घाडगे, ज्योतीराम घाडगे, प्रदीप येवले, रावसाहेब दगडे, शहाजी घाडगे, श्रीकांत येवले, गणेश टकले, गोकुळ मांडवे, अभिमान घाडगे, राघू घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!