दिलीप तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी सलग चौथ्यांदा निवड
केम (प्रतिनिधी /संजय जाधव ) : केम (ता. करमाळा) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते दिलीप तळेकर यांची कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी सलग चौथ्या वेळेस बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीनंतर विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. केम येथील नागरिकांनी या निवडीचे जोरदार स्वागत केले आहे.