युवासेनेच्या वतीने मोहोळकरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : माजी पर्यावरण मंत्री युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या “भगवा सप्ताह” कार्यक्रम अंतर्गत करमाळा तालुक्यातील मोरवड येथील मोहोळकर वाडी जिल्हापरिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थांना युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या हस्ते वही, पेन,खोडरबर, पट्टी, सिसपेन्सील अंकलिपी या शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
या वेळी युवासेना विभाग प्रमुख व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष छगन मोहोळकर, शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे तालुका अध्यक्ष महेश काळे पाटील, सोसायटी चेअरमन बापू आदलिंगे, ग्रामपंचायत सदस्या सौ मनिषा दिवटे, नेमचंद मोहोळकर, शाळा समिती सदस्य पांडुरंग आदलिंगे, गणेश आदलिंगे, समाधान मोहोळकर, बापू मोहोळकर, राजेंद्र निंबाळकर, लहू दिवटे,अंगणवाडी सेवीका मंगल चव्हाण, मदतनीस अंजना मोहोळकर यांच्यासह बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत, मुख्याध्यापक मनोज जाधव यांनी केले तर आभार सहशिकक्षक वसूदेव बडे यांनी मानले. युवासेनेच्या या उपक्रमाचे मोहोळकर वाडी येथील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.