कोंढारचिंचोलीच्या उपसरपंच पदी ज्ञानेश्वर गलांडे यांची बिनविरोध निवड
केम (संजय जाधव) – कोंढार चिंचोली या गावच्या उपसरपंच पदी रामदास झोळ यांचे समर्थक, झोळ गटाचे नेते ज्ञानेश्वर गलांडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
या निवडीच्या निमित्ताने दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ व सौ.मायाताई झोळ यांनी नवनिर्वाचित उपसरपंचाचे फेटा बांधून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कोंढार चिंचोली गावचे विद्यमान सरपंच शरद भोसले, चंद्रशेखर जगताप, अनिल डफळे, भरत लांडगे,प्रकाश गलांडे, मनोज कांबळे, मनोज साळुंखे, ज्ञानेश्वर शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.