सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मिळणार आहे – स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणीही याचे श्रेय घेऊ नये – अच्युत पाटील
केम ( प्रतिनिधी/संजय जाधव) – मागील वर्षी (ऑक्टोबर २०२२) केम व परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीनंतर पंचनामे झाले. नुकतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून केम मंडल मधील गावांना ६ कोटी ८३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हा नुकसान भरपाई निधी केम भागातील सर्वच शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे मिळत आहे त्यामुळे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणीही याचे श्रेय घेऊ नये असे मत केम येथील एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटील यांनी व्यक्त केले.
प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात ते म्हणाले की,
केम येथे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले होते. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. आमदार,खासदार व तहसीलदार यांनी केम येथे पाहणी दौरा करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.तलाठी व मंडल अधिकारी यांना मी वारंवार फोन करून शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यास विनंती केली. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी मी शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन पाठविले होते. तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल यांना देखील मी मदतीचे आवाहन केले व त्यांनी देखील
नुकसान भरपाई बाबत पालकमंत्र्यासोबत फोन वरून चर्चा केली. पालकमंत्र्यानी देखील लवकरच भरपाईची रक्कम मंजूर करू असे आश्वासन दिले होते.
सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मी शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.याचे श्रेय कोणा एकाला जात नाही.केम भागातील सर्वच शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे आज भरपाई मिळत आहे असे अच्युत पाटील यांनी सांगितले स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणीही याचे श्रेय घेऊ नये असा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे देखील त्यांनी आभार व्यक्त केले.
Related News : केम महसूल मंडलमधील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ८३ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर