शिवसेना करमाळा तालुका प्रमुख पदी अनिल पाटील यांची निवड
करमाळा (दि.३) – शिवसेना (शिंदे गट) करमाळा तालुका प्रमुख पदी अनिल पाटील यांची निवड शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे करण्यात आली आहे. सचिव संजय मोरे यांनी ही निवड केली आहे. ठाणे येथील आनंद आश्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.
यावेळी खासदार नरेश मस्के, माजी मंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले, करमाळा विधानसभा निरीक्षक अजय मोरे, शहर प्रमुख संजय शिलवंत आदीजण उपस्थित होते.
अनिल पाटील हे करमाळा तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक असून गेल्या 30 वर्षापासून ते शिवसेनेचे काम करत आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडणार असून येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.