माजी आमदार नारायण पाटील यांचा शिवसेनेला राजीनामा
केम (संजय जाधव) : माढा लोकसभा मतदारसंघ महायुतीला जोरदार धक्के बसत असून मोहिते पाटील यांच्या नंतर करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शि्सेनेचा राजीनामा दिला असून पाटील हे 26 एप्रिल रोजी करमाळयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेत हजारो कार्यकर्ते सह प्रवेश करणार आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यात राजकारणात बरीच उलथा पालथ होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी 14 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती व पाटील यांनी भाषणातूनच आपली पुढील दिशा ठरवली होती माजी आमदार नारायण पाटील यांनी महायुती सोडू नये म्हणून भाजपाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वैयक्तिक रित्या नारायण पाटील यांची भेट घेतली होती तसेच आरोग्य राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली होती परंतु या भेटीचा कोणताही उपयोग झाला नाही त्यामुळे शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे.
नारायण पाटील यांनी 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती व त्यांचा विजय झाला होता परंतु 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून त्या ऐवजी बागल गटाचे नेत्या रश्मीताई बागल यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती तर नारायण पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये नारायण पाटील यांचा निसटता पराभव झाला यांना दोन नंबरची मते मिळाली तर रश्मी बागल यांना तिसरा क्रमांकाची मते मिळाली होती. आता पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत असल्याने तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी क्रांग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे व माढा लोकसभा निवडणूकित मोहिते पाटिल यांना फायदा होणार आहे त्यामुळे करमाळा तालुका राजकारणात चर्चैचा विषय झाला आहे.