केम येथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची जाहीर सभा

केम(संजय जाधव) – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचे केम (ता. करमाळा) येथे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा. होणार आहे.

सभेत शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, ऊस व फळबाग उत्पादनाला योग्य दर तसेच असंघटीत कामगारांचे प्रश्न या विषयांवर चर्चा होणार आहे.
या सभेला शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, ऊस उत्पादक, फळबागा उत्पादक तसेच असंघटित कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केले.




