आगामी निवडणुका महायुती म्हणून ताकदीने लढवणार — गणेश चिवटे -

आगामी निवडणुका महायुती म्हणून ताकदीने लढवणार — गणेश चिवटे

0

करमाळा  (दि. १ नोव्हेंबर) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून करमाळा तालुक्यातही नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या सर्व निवडणुका महायुती म्हणून एकदिलाने आणि ताकदीने लढवून विजय मिळवू, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना चिवटे म्हणाले, “करमाळा तालुक्यात महायुतीची ताकद प्रचंड आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजितदादापवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकपक्षांनी एकत्रितपणे प्रभावी तयारी सुरू केली आहे.”

पुढे चिवटे म्हणाले, “करमाळा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद मतदारसंघ, बारा पंचायत समित्या आणि करमाळा नगरपालिकेतील निवडणुका महायुती म्हणून संघटितपणे लढवल्या जातील. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. सर्वपक्षीय समन्वयातून तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!