गणेशनगर, कृष्णाजीनगर व शाहूनगर भागातील वाढलेली झाडे-झुडूपे काढून परिसरस्वच्छ करावा - माजी नगरसेविका स्वाती फंड - Saptahik Sandesh

गणेशनगर, कृष्णाजीनगर व शाहूनगर भागातील वाढलेली झाडे-झुडूपे काढून परिसर
स्वच्छ करावा – माजी नगरसेविका स्वाती फंड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील गणेशनगर, कृष्णाजीनगर व शाहूनगर या भागातील ओपन स्पेस मधील वाढलेली झाडे-झुडूपे काढून परिसर स्वच्छ करावा तसेच कृष्णाजीनगर येथील सर्व गटारींची पडझड झाल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या भागात नवीन गटारी बांधण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगरसेविका स्वाती महादेव फंड यांनी केली आहे.

याबाबत सौ.फंड यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गणेशनगर, शाहुनगर, कृष्णाजीनगर या परिसरात असलेल्या ओपन स्पेस मध्ये झाडे-झुडूपे तसेच गवत वाढलेले आहे. ते काढून परिसर स्वच्छ करावा. तसेच या भागात गटारींची पडझड झाली असून तुंबलेले पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी
सुटली आहे. अनेक गटारी वरून पाणी वाहत आहे. कृष्णाजीनगर भागात सर्व गटारींची पडझड झाल्याने गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे भागाचा सर्व्हे करून नवीन गटारी करण्यात याव्यात. गणेशनगर, शाहुनगर या भागातील ओपन स्पेस मध्ये काटेरी झाडे-झुडूपे वाढलेली आहेत. ते काढून बागबगीचा करणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण कामासाठी या परिसराचा नगरपालिकेला फायदा झालेला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासकीय विभागाने तात्काळ या भागातील गटारी व ओपन स्पेस स्वच्छ करावेत व नव्याने गटारीचे बांधकाम करावे; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल; असाही इशारा
सौ. फंड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!