घारगावच्या सरपंच लक्ष्मी सरवदे यांना सरपंच सेवा संघटनेचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार यावर्षी घारगाव(ता.करमाळा) येथील सरपंच सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांना जाहीर झाला असून येत्या ३० जुलै रोजी त्यांना अहमदनगर येथे जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
लक्ष्मी सरवदे यांचे सामाजिक कार्य व निस्वार्थ भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत गावाचा केलेला विकास तसेच अवैध्य दारू गुटखा जुगार बंदीसाठी ठराव,शेतकऱ्यांना मार्गदर्शन, वृक्ष लागवडी सह विविध योजना राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेले कार्य पाहून त्यांना हा पुरस्कार जाहीर केला असल्याचे संघटनेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने घारगाव व परिसरातील नागरिकांत विशेषतः महिला वर्गामध्ये मोठ्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण झाले आहे.


पुरस्कार वितरण सोहळा ३० जुलै रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह, सावडी रोड येथे होणार आहे. या पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थापक बाबासाहेब पावशे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार ,राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे ,संघटक रवींद्र पवार ,विश्वस्त सुजाता कासार तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

