‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचा मविआ उमेदवार नारायण पाटिल यांना पाठिंबा!
केम (संजय जाधव) – करमाळा विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात ‘मी महाराष्ट वडार संघटनेचे ता.प्रमुख. सागर पवार यांनी करमाळा तालुक्यातील संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडिचे उमेदवार नारायण पाटील यांना जाहिर पाठिंबा दिला.
नारायण पाटील तालुक्याचा सर्वांगीण विकास करु शकतात आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सर्वसामान्य जनतेचा विकास त्यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो अशी खात्री आणि विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या वेळी दिपक मंजुळे,रमेश पवार, विकास ननवरे, गोरख जाधव, देवराव सुकळे, सुनिल डिकोळे, किरण सुकळे,कैलास पवार अंकुश काळे, हबेराव काळे,मेजर यांनी पाठिंबा दिला. या पाठिंबाचे नारायण पाटिल यांनी स्वागत केले आहे.