कुंभारवाडा सुमंत नगर येथील नागरिकांवर अन्याय केल्यास आंदोलन करू- गणेश चिवटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील कुंभारवाडा (सुमंतनगर) येथील समाज मंदिरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील नागरिकांना विश्वासात न घेता समाज मंदिराचे रूपांतर दवाखाना मध्ये करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येथील नागरिकांवर अन्याय केल्यास आपण आंदोलन करू असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी निवेदनाद्वारे करमाळा नगरपालिकेला दिला.
कुंभारवाडा (सुमंतनगर) येथील नागरिकांनी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली त्यांच्या मागणीची दखल घेत गणेश चिवटे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले, या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की कुंभारवाडा येथील समाज बांधव हे आर्थिक परिस्थितीने नाजूक असून त्यांचे लहान कार्यक्रम साखरपुडा, मुंज, लहान मुलांचे बारशे , या सारखे लहान लहान कार्यक्रम या समाज मंदिरात होत असतात त्यामुळे येथील नागरिकांची या समाज मंदिरामुळे सोय होत असून हे समाज मंदिर लोकांच्या वापरात आहे, परंतु आपण या ठिकाणी येथील नागरिकांना विचारात न घेता या समाज मंदिराचे रूपांतर दवाखान्या मध्ये करत आहात तरी येथील नागरिकांवर अन्याय होऊ नये आपण आपल्या नगरपरिषदेच्या इतर जागेवर दवाखाना सुरू करावा व त्यातून जनतेची सेवा करावी अन्यथा कुंभारवाडा सुमंतनगर येथील नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषद समोर घंटानात आंदोलन करू असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, गणेश महाडीक, जयंत काळे पाटील,गोकुळ कुंभार ,अक्षय कुंभार ,वसीम सय्यद, सुनील कुंभार ,शिवाजी कुंभार ,केशव कुंभार, आर .व्ही .परदेशी, विकास कुंभार ,उत्तम कुंभार ,राजेंद्र कुंभार ,तात्यासाहेब कुंभार, राहुल कुंभार, अतुल कुंभार, विशाल कुंभार, सुधीर कुलकर्णी, सौरभ जाधव ,दत्तात्रय कुंभार ,रुद्र कुंभार ,सार्थक कुंभार, समीर सय्यद ,विकी परदेशी, परदेशी महेश कदम सह सुमंत नगर येथील नागरिक महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते..