भाजपच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड -

भाजपच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड

0

करमाळा(दि.२१):  भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी प्रदेश पातळीवरून नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या निवडीनुसार करमाळा तालुका अध्यक्षपदी करंजे गावचे माजी सरपंच काकासाहेब सरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेलगाव येथील शिवम प्राइड हॉटेलमध्ये पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत निवडणूक प्रमुख संदेश काकडे यांच्या हस्ते सरडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे प्रमुख उपस्थित होते. याच बैठकीत करमाळा ग्रामीण मंडळासाठी सचिन पिसाळ यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना काकासाहेब सरडे म्हणाले, “मी गेली अनेक वर्षे भाजपच्या कार्यात सक्रीय आहे. माझ्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आणि नेते गणेश चिवटे यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी व तालुका भाजपमय करण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करणार आहे.”

या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भगवान गिरी गोसावी, निवडणूक निर्णय अधिकारी संदेश काकडे, यलपले साहेब, नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, मोहन शिंदे, डॉ. अभिजीत मुरूमकर, सोमनाथ घाडगे, अशोक ढेरे, लक्ष्मण शेंडगे, लक्ष्मण केकान, शुभम बनगर, अमोल जरांडे, दत्तात्रय पोटे, सागर सरडे, हर्षद गाडे, किरण शिंदे, नाना अनारसे, रंजित पवार, नागनाथ केकान, प्रमोद सोनवणे, दिगंबर राखुंडे, कपिल मंडलिक, रविकिरण माळवे, चंद्रशेखर सरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!