माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात महास्वच्छता अभियानाला सुरुवात
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – माजी नगराध्यक्ष ,शिवसेना नेते वैभवराजे जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करमाळा शहर स्वच्छ करण्यासाठी महास्वच्छता अभियान सुरु केले असून याची सुरुवात आज करमाळा बस स्थानकासमोर सर्व पत्रकारांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.
यावेळी बोलताना वैभवराजे जगताप म्हणाले की, जनसेवेचा वारसा माझे आजोबा कै.नामदेवराव जगताप आणि माझे वडील जयवंतराव जगताप यांच्याकडून मिळालेला आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त इतर अवास्तव गोष्टी टाळून करमाळा शहर स्वच्छ करण्याचे ठरवले आहे.त्यासाठी शहर स्वच्छतेला प्राधान्य देऊन हे अभियान सुरु केले आहे.येत्या काही दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ केले जाईल यासाठी शहरवासियांनी या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,अस्लम वस्ताद कुरेशी नजीर अहमद कुरेशी, प्रशांत ढाळे, अॅड नवनाथ राखुंडे,डाॅ.मनोज कुंभार, श्रेणीक खाटेर, अमोल परदेशी, सुनिल ढाणे, गणेश कुकडे, जोतिराम ढाणे ,बाळासाहेब कांबळे, युवा सेनेचे मयुर यादव, समीर हलवाई, दादा धाकतोडे,वंचित बहुजन आघाडीचे पप्पू लोंढे ,संभाजी होनप, जगदिश परदेशी, रोहिदास आल्हाट हे मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज लालू घोडके,ओंकार आल्हाट,तानाजी कुकडे,उत्तम कांबळे, अमीर घोडके ,अक्षय जाधव, केतन इंदूरे ,सुशांत इंदुरे ,अतुल देवकर, सर्जेराव मांगले ,सूरज इंदुरे, बाळा इंदुरे, विनोद कुकडे ,कुमार माने,रणवीर परदेशी,फराज काझी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.