शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार – बाजार समिती संचालक सागर दोंड
केम ( प्रतिनिधी /संजय जाधव) – करमाळा बाजार समितीमध्ये केम भागातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल नेण्यासाठी तसेच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असणार असल्याचे प्रतिपादन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सागर दोंड यांनी केम येथे केले.
करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी सागर दोंड यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. जगताप गटाच्या वतीने सहकारी संस्था मधुन सागर दोंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडी नंतर दोंड यांचा केममध्ये सत्कार करण्यात आला. या वेळी सागर दोंड म्हणाले की, जगताप गटात एक निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वरिष्ठ पातळीवर संधी दिली जाते. माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड केली हिच माझा कामाची पावती आहे. केम गटामध्ये जगताप गट वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या सत्कार समारंभावेळी केम येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.